नवी मुंबई, 24 डिसेंबर 2016 /AV News Bureau :
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे अनधिकृत बांधकामांवरील कारवाई अधिकच आक्रमक करण्यात आली आसून ऐरोली, सेक्टर 20 मधील एका अनधिकृत घोषित करण्यात आलेल्या पाच मजली इमारतीवर कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामविरोधात अतिक्रमण विभागाच्या वतीने धडक मोहिमा राबविल्या जात आहेत. रस्ते,पदपथ, मार्जिनल स्पेस मधील अतिक्रमणे हटवून चालण्यासाठी व रहदारीसाठी जागा खुल्या केल्या जात आहेत. तसेच अनधिकृत बांधकामांविरुध्द धकड कारवाई केली जात आहे.
ऐरोलीगांव सेक्टर 20 येथे महानगरपालिकेची बांधकाम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पाच मजली इमारत बांधण्यात आली होती. तर सेक्टर 20, ऐरोलीगाव येथेही गांवदेवी मैदानाच्या बाजुला सुरु असलेल्या तीन मजली इमारतीच्या बांधकामास महानगरपालिकेची परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाने दोन्ही बांधकामांवर कारवाई केली.