चित्रभिंतीतून स्त्री सक्षमीकरणासोबत स्वच्छतेचा संदेश

नवी मुंबई, 9 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:

‘जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सीबीडी बेलापूर येथील कपास भवनच्या कुंपण भिंतींवर स्वच्छताविषयक संदेश व चित्रे चितारण्याचा अभिनव उपक्रम सीएसआर अंतर्गत हाती घेण्यात आला आहे. 8 मार्चपासून 13 मार्चपर्यंत सकाळी 8.30 ते 10 आणि दुपारी 1.30 ते 3.30 या वेळेत ‘स्वच्छ सोच’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून भिंतींवरील चित्राच्या माध्यमातून परिसर सुशोभिकरणासोबतच ‘माझा कचरा ही माझी जबाबदारी’ अशी भूमिका नागरिकांच्या मनात ठसविली जाणार आहे. याव्दारे सामाजिक संदेश प्रसारित  करून सामाजिक जबाबदारीचे भानही करून दिले जाणार आहे. या उपक्रमामधून अंगभूत कलागुणांना वाव व मुक्त अवकाश देण्यासोबतच सामुहिकपणे चित्रे रंगविण्यातून एकतेचेही दर्शन घडणार आहे.

स्वच्छता हे केवळ सर्वेक्षणापुरते मर्यादीत राहू नये तर ती नागरिकांची नियमित सवय व्हावी या महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या भूमिकेला सुसंगत असा चित्रभिंतीचा अभिनव उपक्रम टेक महिंद्रा फाऊंडेशनने राबविला जात आहे.

————————————————————————————————————————————————————————————————————

पनवेलला मागणीनुसार पाणी पुरवठा करणे अशक्य- डॉ. रामास्वामी एन.