मुंबई, 7 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:
होळी सणाच्या दरम्यान म्हणजेच दिनांक 20 ते 28 फेब्रुवारी या काळात मध्य रेल्वेच्या भरारी पथकाने बिना तिकीट /अनियमित प्रवास करणाऱ्या 8828 जणांवर कारवाई करून 59 लाख 54 हजार 650 रूपयांचा दंड वसूल केला आहे.
- 25 फेब्रुवारी रोजी 10 लाख 58 हजार 850 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
- 26 फेब्रुवारी रोजी 9 लाख 61 हजार 30 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
- 28 फेब्रुवारी रोजी 7 लाख 31 हजार 95 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मध्य रेल्वे प्रशासनाने विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात होळी उत्सवाच्या काळात व्यापक प्रमाणात कारवाई केल्यामुळे वरील तीन दिवशी गतवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
दरम्यान, प्रवाशांना विनातिकिट प्रवास करू नये आणि कारवाई टाळावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.