नवी मुंबई,5 मार्च 2018 /अविरत वाटचाल न्यूज:
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत उद्या दिनांक 6 मार्च रोजी मुख्य जलवाहिनी दुरुस्ती करण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी जलवाहिनीवरील पाणी पुरवठा मंगळवार दि .06 मार्च रोजी बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात उद्या संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोड मधील पाणी पुरवठा देखील बंद राहील. तसेच बुधवार दि. 7 मार्च रोजी कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होईल. या कालावधीत पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.