पनवेलच्या महापौर,नगरसेवकांची नवी मुंबई महापालिकेला भेट

 

नवी मुंबई, 16 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:

पनवेल महानगरपालिकेच्या महापौर  कविता चौतमोल आणि नगरसेवक, अधिकारी यांनी  नवी मुंबई महानगरपालिकेस सदिच्छा भेट दिली. या भेटीत नवी मुंबई महानगरपालिकेची मालमत्ता कर वसूली प्रणाली व इतर गोष्टींची माहिती त्यांनी घेतली. नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी स्थायी समितीच्या सभापती  शुभांगी पाटील, परिवहन समितीचे सभापती प्रदिप गवस, माजी महापौर तथा नगरसेवक सुधाकर सोनवणे, नगरसेवक रामचंद्र घरत, अनंत सुतार, माजी महापौर सागर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

या सदिच्छा भेटीप्रसंगी पनवेलच्या महापौर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशिला घरत, स्थायी समितीचे सभापती  अमर पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, आरोग्य समितीचे सभापती अरुण भगत, महिला बालकल्याण समिती सभापती  दर्शना भोईर, शिक्षण समिती सभापती विद्या गायकवाड, झोपडपट्टी पुनर्विकास समिती सभापती प्रकाश बिनेदार, बांधकाम समिती सभापती ॲड. मनोज भुजबळ, नगरसेवक जगदीश गायकवाड, ॲड. वृषाली वाघमारे, अनिल भगत, लिना गरड,  संतोष शेट्टी, नितीन पाटील आदी मान्यवर पदाधिकारी  तसेच नगरसचिव अनिल जगधनी, सहा. आयुक्त चंद्रशेखर खामकर उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा मालमत्ता कर विभागप्रमुख धनराज गरड तसेच सल्लागार नारायण मुंडले यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीविषयी माहिती दिली.