- कुणबी राजकीय संघटन समितीची घोषणा
मुंबई,16 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:
कोकणातील कुणबी समाजाचे जीवन मरणाचे प्रश्न गेली अनेक वर्ष पडून आहेत. कोकणातील ओबीसी-कुणबी समाजाला विधानसभेत लोक प्रतिनिधी नाही. कोकणातील सध्याची राजकीय परिस्थिती हि उच्चवर्णीय लोकांच्या वर्तुळात गुंतलेली आहे त्यांना ओबीसी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोकणातील कुणबी आणि ओबीसी समाजातील विविध संघटनांनी २०१९ च्या विधानसभेसाठी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
कुणबी राजकीय संघटन समितीची महत्वाची बैक कुणबी ज्ञाती गृह, मुंबई, परळ येथील वाघे हॉलमध्ये नुकतीच (11 फेब्रुवारी) पार पडली. या सभेला कुणबी समाजाच्या विविध संघटना व त्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे, सरचिटणीस अरविंद डाफळे, युवक अध्यक्ष माधव कांबळे, राजकीय संघटन समिती प्रमुख कृष्णा कोबनाक, कुणबी भूमिपुत्र सेनेचे वसंत भडवलकर, बहुजन विकास आघाडीचे नंदकुमार मोहिते, पालघर जिल्हातील सुवर्णा पाटील, तसेच शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजपा, बसपा अशा विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
- कोकणात कुणबी समाज हा प्रचंड लोकसंख्येने आहे. या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावे म्हणून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे उमेदवारीची मागणी करण्यात येणार आहे. जर का या मागणीची दखल कोणत्याही पक्षाने घेतली नाही तर कुणबी समाज, ओबीसी बहुजन समाजातील विविध संघटनांना सोबत घेवून विधान सभेच्या जागा लढविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.