मुंबई, 25 जानेवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:
युनेस्कोच्या जागतिक वारसा ठिकाणांच्या यादीत स्थान मिळविलेल्या जगप्रसिद्ध एलिफंटा लेण्यांच्या परिसरात घारापुरी बेटांवर 27आणि 28 जानेवारी रोजी एलिफंटा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला नागरिकांना जाता यावे यासाठी या दोन दिवशी गेट वे ऑफ इंडिया येथून सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत नियमित लाँच सेवा असेल आणि रात्री ९ ते १०.१५ या वेळेत परतीच्या प्रवासासाठी लाँच सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने दिली आहे.
या महोत्सवातील प्रमुख आकर्षणे
- २७ जानेवारी, वेळ – सायंकाळी ७ ते रात्री ९
- झिया नाथ आणि सनातन चक्रवर्ती यांचा ‘डान्स ऑफ लव्ह’ हा नृत्याविष्कार
- फ्युजन तबला, बासरीवादन आणि कीबोर्ड वादन
- समीर नागदेव डान्स आर्ट्सतर्फे ध्रुत नृत्य
- २८ जानेवारी, वेळ – सायंकाळी ६ ते रात्री ९.४०
- वडाली बंधुंची सूफी मैफल
- हंस राज हंस यांची सूफी मैफल
- नितीश भारती यांची वाळू कला
- डॉ. परिणिता शहा यांचा कथक नृत्याविष्कार
- ऐश्वर्या आणि स्मृती बेदाणे यांचे लावणी नृत्य
=============================================================================================================