अंगणेवाडी जत्रेसाठी आणखी विशेष रेल्वेगाड्या

मुंबई, 22 जानेवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज

कोकणातील अंगणेवाडी जत्रेला जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वेमार्गावर आणखी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 25 ते 28 जानेवारी दरम्यान या विशेष गाड्या चालवण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडणाऱ्या अंगणेवाडी जत्रेसाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक कोकणात जात असतात. यामध्ये दरवर्षी भाविकांची भर पडत असते. ही वाढती गर्दी लक्षात घेवूनच कोकण रेल्वे मार्गावर आणखी गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.anganewadi jatra

गाडी क्रमांक 01437/01438 लो.टिळक टर्मिनस रोड ते सावंतवाडी-लो.टिळक टर्मिनस विशेष

  1. गाडी क्रमांक 01437 लो.टिळक टर्मिनस रोड ते सावंतवाडी ही विशेष गाडी 26 जानेवारी रोजी मध्यरात्री 12.45 ला लो. टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11.30 वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
  2. 0148 सावंतवाडी रोड- लो.टिळक टर्मिनस रोड ही विशेष गाडी दुपारी 1.10 ला सावंतवाडी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 12.20 ला लो.टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

या विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

  • डब्यांची रचना

या विशेष गाड्यांना 20 डबे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये फर्स्ट एसी कोच 1डबा, फर्स्ट एसी आणि 2 टायर एसी कोच 1 डबा, 2 टायर एसी 4 डबे, 3 टायर एसी 11 डबे आणि जनरेटर,एसएलआरचे 2 डबे असणार आहेत. जोडण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक 01163/01164 पुणे ते सावंतवाडी- पुणे

  1. गाडी क्रमांक 01163 पुणे ते सावंतवाडी ही विशेष गाडी 25 जानेवारी रोजी सायंकाळी 6.45 ला पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 01164 सावंतवाडी ते पुणे ही विशेष गाडी 26 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजता सावंतवाडी येथून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5.20 वाजता पुणे येथे पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

या गाडीला लोणावळा, पनवेल,रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ स्थानकात थांबे देण्यात आले आहेत.

  • डब्यांची रचना

या गाडयांना 14 डबे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये 2टायर एसीचा 1 डबा, 3 टायर एसीचा 1 डबा,स्लीपर 6 डबे, जनरल 4 डबे आणि एसएलआरचे 2 डबे असणार आहेत. जोडण्यात येणार आहेत.

 

गाडी क्रमांक 01159/01160 मुंबई सीएसएमटी-मडगाव- लो.टिळक टर्मिनस

  1. गाडी क्रमांक 01159 सीएसएमटी-मडगाव ही गाडी 28 जानेवारी रोजी मध्यरात्री 12.20 ला सुटले आणि त्याच दिवशी दुपारी 12.30 ला मडगाव स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 01160मडगाव- लो.टिळक टर्मिनस ही गाडी 28 जानेवारी रोजी सायंकाळी 4.40 ला मडगावहून सुटेल आणि पहाटे 4.10 ला लो.टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

या गाड्यांना दादार, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण,रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, थिविम आणि करमाळी स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत.

  • डब्यांची रचना

या गाड्यांना 18 डबे जोडणार आहेत. त्यामध्ये 3 टायर एसीचे 5 डबे, स्लीपरचे 5 डबे, जनरलचे 6 डबे आणि एसएलआरचे 2 डबे असणार आहेत.