सोमवारचा पाणीपुरवठा बंद मागे

  • 22 व 23 जानेवारी रोजी पाणीपुरवठा राहणार सुरळीत

 नवी मुंबई, 20 जानेवारी 2018/avirat vaatchal news:

नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभागामार्फत मुख्य जलवाहिनीच्या कामाच्या अनुषंगाने दि. 22 जानेवारी 2018 रोजी सकाळी 8.00 ते 23 जानेवारी 2018 रोजी पहाटे 1.00 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहाणार होता. मात्र दुरूस्तीचे काम त्यादिवशी न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे 22 आणि 23 जानेवारी 2018 रोजीचा पाणी पुरवठा नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कळवले आहे.