- भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक अतुल शाह
मुंबई, 16 जानेवारी 2018/avirat vaatchal news :
‘विकासको नई उंचाईयो पे पहुचाने का संकल्प’ या शिर्षकाखाली मुंबईत मकरसंक्रातींनिमित्त पंतगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे प्रवक्ते माजी आमदार आणि विद्यमान नगरसेवक अतुल शाह यांनी या अनोख्या पतंगोत्सवाचे आयोजन केले होते.
पतंगोत्सवाच्या माध्यमातून पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखंड हिंदुस्थानाचा विकास करण्याच्या संकल्पनेला लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे अतुल शाह यांनी सांगितले.
मकरसंक्रातीच्या दिवशी दुपारी 3 ते रात्री 8 या काळात पतंगोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित नागरिकांना तिळगुळाचे लाडू देण्यात आले.
या कार्यक्रमाला कुलाबा विधानसभेचे आमदार आणि मंत्री राज पुरोहीत, मलबारहिल विधानसभेचे आमदार मंगलप्रभाज लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, महाराष्ट्र भाजपाच्या कोषाध्यक्ष शायना एन.सी., पक्षाचे प्रवक्ते मधु चव्हाणा, नगरसेविका रिटा मकवाना आणि पक्षाचे अन्य मान्यवर पदाधिकारी आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.