मुंबई, 16 जानेवारी 2018 :avirat vaatchal news:
प्लॅस्टिक पासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या, थर्माकोलच्या प्लेटस्, ताट, वाट्या, चमचे, कप, ग्लास, बॅनर्स, तोरण, ध्वज आदी सर्व प्रकारचे प्लॅस्टिक वेस्टन याचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण आणि विक्री करण्यास संपूर्ण राज्यात लवकरच बंदी घालण्याबाबतची अधिसूचना पर्यावरण विभागाने जाहीर केली आहे.
- प्लॅस्टिक पिशव्या व प्लॅस्टिकची इतर उत्पादने ही नैसर्गिकरित्या नष्ट होत नाही. त्याचा परिणाम पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. नाल्यांमध्ये तसेच गटारांमध्ये प्लास्टिक अडकून राहिल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पाणी तुंबून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तसेच प्लॅस्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात गेल्याने त्यांचा मृत्यू होतो. प्लास्टिकमुळे एकूणच होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी त्याचा संपूर्णपणे वापर थांबावा, निर्मिती थांबावी म्हणून लवकरच शासनातर्फे बंदी घालण्याच्या विचारात आहे.
- प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वस्तुंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत आणि जनतेत जनजागृती करण्यासाठी संबधित नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही कळविण्यात आले आहे. याशिवाय मॉल्स, दुकानदार, मोठे व्यापारी, भाजी विक्रेते, हॉटेल व्यावसायिक यांनीही प्लॅस्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहनही पर्यावरण विभागाने केले आहे.