गोव्यासाठी 23 डिसेंबरपासून विशेष गाड्या

  • ख्रिसमस तसेच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मार्गावर 12 विशेष गाड्या

नवी मुंबई, 21 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:

ख्रिसमस तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी, कोकणात आणि  गोव्याला जाणाऱ्यांची संख्या आतापासूनच वाढू लागली आहे. यापार्श्वभूमीवर होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेवून मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगावदरम्यान 12 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 23 डिसेंबर2017 ते 5 जानेवारी 2018 या काळात या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्क आकारण्यात येणार आहे. special train on konkan railway

 

01085 साप्ताहीक विशेष गाडी (6 फेऱ्या)

ही गाडी 23,25,28,30 डिसेंबर तसेच 1आणि 4 जानेवारी 2018 रोजी एलटीटीहून पहाटे 5.33 ला सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5.30 ला मडगाव रेल्वे स्थानकात पोहोचेल.

 

01086 साप्ताहीक  विशेष गाडी (6 फेऱ्या)

ही गाडी 24,26,29,31 डिसेंबर तसेच 2आणि 5 जानेवारी 2018 रोजी मडगावहून सकाळी 5.33 ला सुटून त्याच दिवशी सायंकाळी 5.30 ला एलटीटी स्थानकात पोहोचेल.

 

या गाड्यांचे थांबे

मुंबई ते मडगावदरम्यान धावणाऱ्या या विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी,कणकवली, सावंतवाडी, थिविम आणि करमाळी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

डब्यांची रचना

या विशेष गाड्यांना 1 वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 11 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 5 स्लीपर

गाड्यांचे आरक्षण

01085/01086 विशेष गाड्यांचे विशेष शुल्कासह आरक्षण सर्व पीआरएस तसेच वेबसाइट www.irctc.co.in वर 22 डिसेंबरपासून मिळणार आहे.