कामोठयातील भगत कुटुंबीयांचा अवयवदानाचा निर्णय

पनवेल /AV News Bureau:

कामोठे शहर भाजपचे अध्यक्ष डॉ. अरुणकुमार भगत यांनी आपल्या आईच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त कुटुंबातील १३ सदस्यांचा अवयवदान संकल्प केला आहे. कामोठे सेक्टर १४ मधील कराडी समाज सभागृहामध्ये 20  डिसेंबर रोजी शेकडो कामोठेकरांनी पार्वती भगत यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांच्या कुटुंबियांचेही या निर्णयाबद्धल अभिनंदन केले. भगत कुटुंबियांच्या या संकल्पापासून प्रेरणा घेऊन या कार्यक्रमस्थळी ४ नागरिकांनीही अवयवदानाचा निर्णय घेतला.

पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे आणि धन्वंतरी ऑर्गनायझेशनचे संस्थापक डॉ. कैलास जवादे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कामोठ्यातील निवृत्त शिक्षिका पार्वती भगत यांचा वाढदिवस साजरा झाला .यावेळी भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील,सूरदास गोवारी,भाऊ भगत,स्वामी म्हात्रे,डॉ राजेंद्र विटकरी,डॉ सचिन जाधव,डॉ राजेंद्र डहाके,मदनदादा  गोवारी,जगणदादा पावणेकर,खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल,प्रशांत कदम,स्मिता तामखेडे,माया अहिरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.  या वाढदिवस सोहळ्याला केक कापण्यात आला नाही तसेच हारतुरेसुद्धा स्वीकारण्यात आले नाहीत.

अवयव दान करणाऱ्या व्यक्ती

पार्वती शंकर भगत, अरुणकुमार शंकर भगत, ऍड. आशा अरुणकुमार भगत, कृष्णकांत शंकर भगत, मीना कृष्णकांत भगत,महेंद्र शंकर भगत, रेश्मा महेंद्र भगत, ऍड. हेमंतकुमार शंकर भगत,ज्योत्स्ना हेमंत कुमार भगत, कैलास शंकर भगत,नेहा कैलास भगत, कु.आदित्य अरुणकुमार भगत, कु.मनीष कृष्णकांत भगत,