- स्वदेशी बनावटीची पाणबुडी
मुंबई, 14 डिसेंबर 2017/avirat vaatchal news
स्कॉर्पिन श्रेणीतल्या पहिल्या ‘कलवरी’ पाणबुडीचे जलावतरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत माझगांव डॉक येथे करण्यात आले. माझगाव गोदीत बांधण्यात आलेली स्वदेशी बनावटीची पहिली ही पाणबुडी आहे. तब्बल दोन दशकांनंतर भारतात पाणबुडी बांधणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. कलवरी ही पाणबुडी नौदलाकडे सुपूर्द केल्याने महत्त्वाच्या टप्प्याची पूर्तता झाली.
हिंदी महासागरात आढळणाऱ्या विक्राळ शार्कच्या नावावरुन कलवरी हे नाव देण्यात आले आहे.
21 वे शतक हे आशियाचे असून या शतकाच्या विकासाचा मार्ग हा हिंदी महासागरातून जातो. हिंदी महासागराला विशेष स्थान असून सागरी विकासामुळेच राष्ट्रनिर्माणासाठी आर्थिक प्रगती साध्य होते असे मत यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले.
आधुनिक काळात युध्द नीतीमध्ये, विनाशी, शक्तीशाली आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पाणबुडया आपल्या राष्ट्राच्या शांततेसाठी आणि जरब ठेवण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. जागतिक शांततेच्या दृष्टिकोनातून आयएनएस कलवरीचे महत्व असल्याचे संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी बोलताना सांगितले.
भारतीय नौदल आणि फ्रान्सच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट 75 अंतर्गंत आयएनएस कलवरीबांधण्यात आली आहे. फ्रान्सचे नौदल संरक्षण आणि ऊर्जा कंपनी डीसीएनएस यांनी या पाणबुडीचे आरेखन केले आहे. स्कॉर्पेन वर्गातल्या भारतीय नौदलात समाविष्ट होणाऱ्या सहा पाणबुडयांपैकी ही पहिली पाणबुडी आहे.
पंतप्रधानांनी या पाणबुडीचे नामकरण ‘सागर’ (S. A. G. A. R.) असे केले. या नावाचे पूर्ण रूप ‘security and growth for all in the region’ असे आहे.