नागपूर 11 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:
रास्ता रोको आंदोलनादरम्यान पोलिसांनी अटक करताना झालेल्या झटापटीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या हाताला लागल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आली.
हिवाळी अधिवेशन सुरु झालेले असतानाच नागपूर शहराच्या प्रवेशद्वारातच राज्य सरकारच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. या रास्तारोको आंदोलनाममुळे नागपूर शहराकडे जाणारी आणि शहराकडून बाहेर पडणारी वाहतुक जाम झाली होती. त्यामुळे नागपूर पोलिसांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य आंदोलकांना बाजूला करण्यास सुरुवात केली. त्यावेळी झालेल्या झटापटीत सुप्रिया सुळे जखमी झाल्या. त्यांच्या हाताला दुखापत झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.
नागपूर विमानतळ रोडवर आज @NCPspeaks च्या हजारों कार्यकर्त्यांनी ‘चक्का जाम आंदोलन ‘केले. यावेळी पोलिसांनी माझ्यासह इतर नेत्यांना, कार्यकर्त्याना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. यादरम्यान नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी व हल्लाबोलच्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून टाकला. pic.twitter.com/R3LK9Nk8OW
— Supriya Sule (@supriya_sule) December 11, 2017
दरम्यान, पोलिसांनी खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य आंदोलकांना अटक करुन काही वेळातच सोडून दिले.