अविरत वाटचालने याबाबत केला होता पाठपुरावा
—————————————————————————————————————————————
- नवी मुंबई, 8 डिसेंबर 2017/Avirat Vaatchal News :
गेल्या अनेक महिन्यांपासून बांधून पूर्ण असलेले आणि उद्धघाटनाअभावी रखडलेले उलवे येथील अग्निशमन केंद्र आज अखेर सुरू करण्यात आले. शहीद तुलसीदास रघुनाथ घरत यांच्या वीरपत्नी काशीबाई तुलसीदास घरत यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अग्निशमन जवानांच्या ताफ्याने सलामीदेखील दिली. ulwe fire station
सिडको कार्यक्षेत्रातील नवीन पनवेल, खारघर, कळंबोली, द्रोणागिरी व आता उलवे या नोड्समध्ये अग्निशमन केंद्रे आहेत. सिडकोने उरण तालुक्यात उलवे नोड विकसित केला आहे. किल्ला ते उरण कडे जाणा-या मार्गावर वहाळ गावापासून आतील बाजूस उलवे नोड मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. उलवे नोडमध्ये सिडकोने उन्नती हा गृहप्रकल्प उभारताना शेजारीच अग्निशमन दलाचे केंद्र उभारले आहे. या भागातील लोकसंख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. मात्र एकीकडे लोकसंख्येचा वाढता आलेख तर दुसरीकडे अग्नि सुरक्षेच्या सुविधांबाबतची वानवा असा विरोधाभास सध्या उलवे नोडमध्ये दिसून येतो. या पाशर्वभूमीवर हे केंद्र महत्वाचे मानले जात आहे.
उलवे अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांची संख्या
- या अग्निशमन केंद्रात 30 कर्मचारी असणार आहेत.
- 1 फायर इंजिन
- 1 जीप आणि इतर महत्वाची सामुग्री
या अग्निशमन केंद्रात एक ट्रेनिंग सेंटरही सुरु करण्यात आल्याी माहिती सिडकोचे मुख्य अग्निशमन अधिकारी अरविंद मांडके यांनी दिली.
उलवे अग्निशमन केंद्राचा संपर्क क्रमांक
9029003201
पारंपरिक पद्धतीने लोकार्पण
सदर केंद्राचे पारंपरिक पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. अग्निशमन सेवेच्या प्रथेप्रमाणे बेल वाजवून हे अग्निशमन केंद्र नागरिकांच्या सेवेत रूजु झाल्याचे जाहीर करण्यात आले. नंतर सर्व अग्निशमन वाहनांचे सायरन वाजविण्यात आले. त्याचप्रमाणे रंगीत फुगे आकाशात सोडून एका फायर इंजीनने उलवे परिसरात फेरी मारली.