मुंबई, 9 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:
मध्य रेल्वेतर्फे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी येत्या 11 नोव्हेंबर रोजी कोकण रेल्वे मार्गावर मनमाड ते सावंतवाडी अशी विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. ही गाडी सायंकाळी सव्वा चार वाजता मनमाड रेल्वेस्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात पोहोचेल.
- मनमाड-सावंतवाडीदरम्यान चालविण्यात येणाऱ्या 01198 या विशेष गाडीला नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, चिपळुण, संगमेश्वर, रत्नागिरी, विलवडे रोड, राजापुर , वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
- या गाडीला 12 स्लीपर कोचचे डबे जोडण्यात येणार आहेत. शिवाय 2 सामान्य सेकंड क्लास आणि पेंट्री कार असणार आहेत.
- 8 नोव्हेंबरपासून या विशेष गाडीचे आरक्षण विशेष शुल्कासह सुरू करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.