प्रो. डॉ.सुदर्शन रणपिसे यांना ‘डी लिट’

 

  • श्रीलंका येथे भव्य कार्यक्रमात डॉ. रणपिसे यांना पदवी प्रदान करणार

नवी मुंबई, 11 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:

भारती विद्यापीठाच्या दंतवैद्यक विभागातील ओरल मेडिसीन अण्ड रेडिओलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुदर्शन रणपिसे यांना डी लिट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. मेडिसिना अल्टरनेटीव्हा आणि ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फॉर कॉम्प्लिमेंटरी मेडिसन्सने डॉ. सुदर्शन रणपिसे यांना सर्वोच्च डी.लिट पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. doctor sudarshan ranpise

येत्या 27 नोव्हेंबर रोजी डॉ. रणपिसे आपला सर्वोच्च बहुमान स्वीकारण्यासाठी श्रीलंकेला जाणार आहेत.  सुमारे 30 हून अधिक वर्षांचा या क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यामुळेच मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक भागांतून रूग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येत असतात. त्यांच्या या प्रदीर्घ वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कामाचा गौरव म्हणून  अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी डॉ. रणपिसे यांना सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. सुदर्शन रणपिसे यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात घेतलेला हा आढावा…