पोलिसांचा आहारभत्ता वाढला

मुंबई,3 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आनंदची बातमी आहे. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आहारभत्ता जवळपास दुपट्टीने  वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. हा वाढीव लाभ 1 डिसेंबर2017 पासून मिळणार आहे.

पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कर्त‌व्‍यानिमित्त त्यांचे राहते घर आणि पोलीस ठाणे यापासून दूर रहावे लागते. अशावेळी त्यांना उत्तम आहार घेता येण्यासाठी आहारभत्ता देण्यात येतो. पोलिसांसमोरील वाढलेली आव्हाने आणि आहारांच्या किंमतीत झालेल्या वाढीचा विचार करता त्यांच्या आहारभत्त्यात वाढ करणे गरजेचे होते. त्यांना मिळणाऱ्या आहारभत्त्यात 2011 पासून कोणतीही वाढ झाली नव्हती. पोलिसांचे आरोग्य व मनोधैर्य उत्तम ठेवण्यासाठी त्यांना चांगला व सकस आहार मिळणे आवश्यक असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भत्तावाढीचा निर्णय घेतला.

नव्या निर्णयानुसार मिळणारा आहारभत्ता

  • पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,फोटोग्राफर यांना मिळणारा 840 रुपयांचा आहार भत्ता आता 1500 रुपये  मिळणार
  • पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई (सशस्त्र व नि:शस्त्र) यांना मिळणारा 700 रुपयांचा भत्ता आता 1350 रुपये  मिळणार