मुंबईतील 4 स्थळांना युनेस्को वारसा पुरस्कार

 नवी दिल्ली 2 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal Bureau:

मुंबई शहरातील चार स्थळांना युनेस्को वारसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. युनेस्कोने  1 नोव्हेंबरला आपल्या सांस्कृतिक वारसा पुरस्काराची घोषणा केली. भारतातील 7 वारसा स्थळांचा यामध्ये समावेश आहे. यातील 4 वारसा स्थळे ही मुंबईतील आहेत. सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आज आशिया-पॅसिफिक पुरस्काराची घोषणा युनेस्को ने केली आहे. unesco award for four heritage places in mumbai

 

मुंबईतील 4 वारसा स्थळे

  • ख्रिस्त चर्च (Christ church, भायखळा चर्च

  • रॉयल बॉम्बे ऑपेरा हाऊस

या दोन वारसा स्थळांना गुणवत्ता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 

  • बोमोनजी होरमर्जी वाडिया फौंटेन अँड  क्लॉक  टॉवर

  • वेलिंग्टन फौंटेन

या दोन वारसा स्थळांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

युनेस्कोने वारसा पुरस्कार जाहीर केलेली  भारतातील इतर तीन स्थळांमध्ये 1) श्री.रंगनाथस्वामी मंदिर ( श्रीरंगमतामिळनाडू) 2) गोहड फोर्ट ( मध्यप्रदेश) 3) हवेली धर्मपुरा (दिल्ली) यांचा समावेश आहे.

  • आशिया -पॅसिफिक क्षेत्रातील सांस्कृतिक वारसा स्थळाचे संवर्धन  करण्यासाठी स्थानिक नागरिक व खासगी क्षेत्रातील संस्थांना संस्कृती संवर्धनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी युनेस्को सांस्कृतिक वारसा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.