20 दिवसांत 11.35 कोटीचा दंड वसूल

  • मध्य रेल्वेतर्फे विनातिकिट प्रवाशांविरोधात कारवाई

मुंबई, 25 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

मध्‍य रेल्‍वे ने 1 ते 21 ऑक्‍टोबर 2017 च्‍या दरम्‍यान विना तिकीट आणि अनियमित प्रवाशां विरूध्‍द अभियान  राबवून 11 कोटी 35 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही दंडवसूली 61.48 टक्क्यांनी वाढली आहे.

 

1 ते 21 ऑक्‍टोबर 2017 च्‍या दरम्‍यान विना तिकीट/अनियमित प्रवास आणि विना बूक केलेल्‍या सामानाचे एकूण 2.20 लाख प्रकरणे नोंदविली. (गेल्यावर्षीच्या तुलनेत 44.90 टक्के वाढ)

गेल्यावर्षी म्हणजे 1 ते 21 ऑक्‍टोबर 2016 या काळात विना तिकीट/अनियमित प्रवास आणि विना बुक केलेल्‍या सामानाची 1.52 लाख प्रकरणे नोंदवली गेली होती.

 

1 ते 21 ऑक्‍टोबर 2017  च्‍या दरम्‍यान दंडाच्‍या स्‍वरूपात रूपये 11.35 करोड वसूल करण्‍यात आले

गेल्यावर्षी म्हणजे 1 ते 21 ऑक्टोबर 2016 या काळात दंडाची ही रक्क 7.03 करोड होती .