मेन, हार्बरवर उद्या (8 ऑक्टोबर) मेगाब्लॉक

मुंबई, 7 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

रेल्वे रुळ तसेच ओव्हरडेह वायर यांच्या देखभाल आणि दुरूस्तीसाठी मध्य रेल्वेने मेन आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी (8 ऑक्टोबर) मेगाब्लॉक जाहीर केला आहे. mega block on central railway

मेन लाइन :

कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.15 ते  दुपारी 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. 

  •  सकाळी 11 वाजल्‍यापासून दुपारी 4.21 पर्यंत कल्याणहून सुटणा-या अप जलद मार्गाच्‍या सेवा कल्याण व ठाणे स्‍थानकादरम्‍यान अप धीम्‍या मार्गावर चालवण्‍यात येतील. त्याशिवाय ठाणे व सीएसएमटी स्‍थानकादरम्‍यान आपल्‍या निर्धारित अप जलद मार्गावर चालवण्‍यात येईल. या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्‍थानकावर थांबेल. ही गाडी 20 मिनिटे उशिराने धावेल. mega block on central railway
  • सकाळी 10.08  पासून दुपारी 2.42 पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या सर्व डाउन जलद गाड्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, एवं मुलुंड, स्‍थानकावर थांबतील. या गाड्या 15 मिनिटेश उशिराने धावतील . mega block on central railway

पैसजर गाड्या

  • 8.ऑक्टोबरची गाडी क्रमांक 50104 रत्‍नागिरी-दादर पैंसजर ही दिवा स्थानकापर्यंतच चालविण्यात येईल. तसेच गाडी क्रमांक 50103 दादर-रत्‍नागिरी पैंसजर ही गाडी दिवा स्थानकातून पुढे रत्नागिरीसाठी रवाना होईल.  मेगाब्लॉकच्या काळात मुंबईला येणा-या तसेच मुंबईबाहेर जाणा-या  मेल/एक्‍सप्रेस गाड्या 20 ते 30 मिनिटे उशिराने धावतील .

हार्बर लाइन :

  • छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / बांद्रा डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 वाजल्‍या पासून दूपारी 4.40 वाजे पर्यंत आणि चुनाभट्टी / बांद्रा – छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 वाजल्‍या पासून सायंकाळी 4.10 वाजे पर्यंत  मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
  • सकाळी 11.34 पासून दूपारी 4.47 पर्यंत सीएसएमटीहून वाशी/बेलापुर/पनवेल करीता सुटणा-या सर्व गाड्या आणि सकाळी 9.56 पासून सायंकाळी 4.43 या काळात सीएसएमटीहून  वांद्रे/अंधेरी  करीता सुटणा-या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • सकाळी 9.53 पासून दूपारी 3.20 पर्यंत पनवेल/बेलापुर/वाशी येथून सीएसएमटीकरीता सुटणा-या अप हार्बर मार्गाच्‍या सर्व गाड्या आणि सकाळी 10.45 पासून दूपारी 5.09 पर्यंत अंधेरी/बांद्रा येथून सीएसएमटीसाठी सुटणा-या अप हार्बर मार्गाच्‍या गाड्या रद्द करण्‍यात  आल्या आहेत.
  • मेगाब्लॉकच्या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या  सोयीसाठी फलाट क्रमांक 8 वरून पनवेल-कुर्ला विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
  • हार्बर मार्गाच्‍या प्रवाशांना सकाळी 10.00 वाजल्‍या पासून सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत पश्चिम रेल्‍वे आणि मेन मार्गावर यात्रा करण्‍यास परवानगी देण्यात आली आहे.