लोकशाही दिनासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत  अर्ज करा

  •  नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आवाहन

 नवी मुंबई, 7 ऑक्टोंबर 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे 6 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपले अर्ज 19 ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेतर्फे करण्यात  आले आहे. अर्जदारांनी दोन प्रतींमध्ये आपले अर्ज आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे ‘लोकशाही दिनाकरीता अर्ज’ असे दर्शनी भागी  नमूद करुन सादर करावयाचे आहेत. lokshahi din 

  • सदर अर्जात नमूद तक्रारनिवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे
  • अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा
  • अर्जादाराने संबंधित विषयाबाबात याआधी विभाग कार्यालयविभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे
  • न्यायप्रविष्ट प्रकरणेराजस्व/अपिलसेवाविषयक– आस्थापनाविषयक बाबी याबाबातचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • तक्रारनिवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत

 

लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नागरिकांसाठी महानगरपालिका नूतन मुख्यालय इमारत, जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, से. 15 ए, किल्ले गावठांण जवळ, सी.बी.डी., बेलापूर येथे विनामूल्य उपलब्ध आहे. अथवा नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ Website -(www.nmmc.gov.in) यावरील फॉर्मस/अर्ज सेक्शनमधून अर्ज नमुना प्रत डाऊनलोड करुन घेता येऊ शकते.