नवी मुंबई, पनवेलसह मोठ्या शहरांचे लोडशेडींग रद्द

  • दोन दिवसांत 800 मेगावॅट्स वीज उपलब्ध होणार

नवी मुबई, 6 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

गेल्या दोन तीन दिवसांपासून संपूर्ण राज्याला घामाघुम करणाऱ्या लोडशेडींगचा प्रभाव काहीसा कमी होणार आहे. पुढील दोन दिवसांत 800 मेगावॅट्स वीज खुल्या बाजारातून उपलब्ध होणार असल्यामुळे अ आणि ब गटात मोडणाऱ्या मुलुंड, भाडुंप, नवी मुंबई, पनवेल, ठाण्यासह मोठ्या शहरांमध्ये लागू केलेले भारनियमन रद्द करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. मात्र ग्रामीण भागातील लोडशेडींग रद्द करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी आणखी वीज उपलब्ध झाल्यानंतरच संपूर्ण लोडशेडींग रद्द करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. loadsheding-cancel-in-major cities

  • ऑक्टोबर हीटमुळे मुंबई आणि उपनगरातील तापमान 35 अंशापर्यंत वाढले आहे. राज्यातील विजेची मागणी 17 हजार 800 मेगावॅट इतकी पोहोचली आहे. मात्र 15 हजार 700 मेगवॅट इतकीच वीज उपलब्ध झाल्यामुळे  ग्रामीण भागासह अ आणि ब गटात मोडणाऱ्या शहरांमध्येही सक्तीचे लोडशेडींग करण्यात आले. या लोडशेडींगची  झळ मुलुंड, भांडूप या मुंबईच्या काही भागांसह नवी मुंबई, ठाणे, पनवेल आणि इतर मोठ्या शहरांनाही  बसली आहे. या लोडशेडींमुळे सर्व थरातून विरोधाचा सूर निघू लागल्यामुळे राज्य सरकारचीही चागलीच कोंडी झाली. यापार्श्वभूमीवर खुल्या बाजारातून वीज खरेदी करण्यात येत असून लवकरच दोन दिवसात 800 मेगावॅट्स इतकी वीज उपलब्ध होणार आहे.त्यामुळे अ आणि ब गटात मोडणाऱ्या शहरांमधील लोडशेडींग रद्द करण्यात आल्याची माहिती महावितरणचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी दिली. 

लोडशेडींग रद्द होणारी काही शहरे

  • महावितरणतर्फे मुंबई उपनगर (भांडुप, मुलुंड), ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पुणे , नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद आणि इतर मोठ्या शहरांचा समावेश असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

 

 

लोडशेडींगसंबंधित इतर बातम्या

 

पाऊस आला धावून
https://goo.gl/ariiBz

 

पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, उरण परिसरातील लोडशेडींगचे वेळापत्रक
https://goo.gl/arLnk5

 

उलवे, सीबीडीमधील लोडशेडींगचे वेळापत्रक
https://goo.gl/ajeNRi

 

ऑक्टोबर हीटपाठोपाठ लोडशेडींगचा दणका
https://goo.gl/dJBRu9