- राज्यमंत्री रवींद्र वायकर
मुंबई, 4 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:
मुंबई शहर व उपनगरातील अस्तित्त्वात संक्रमण शिबिरातील पात्र भाडेकरु, रहिवाशांना त्याच ठिकाणी घर देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करीत असल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज दिली.transit camp issue
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत मुंबई शहर व उपनगरात अस्तित्त्वात असलेल्या संक्रमण शिबीरातील पात्र भाडेकरु, रहिवासी तसेच अपात्र वास्तव्यास असलेल्या रहिवाशांचे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत स्वतंत्र योजना राबविण्याबाबत मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी बोलताना ही माहिती दिली
- विकासकांना संक्रमण गाळे दिले असून भाडे वसुली तातडीने करण्यासाठी काम बंद करण्याचे आदेश महापालिकेला द्यावेत. सायन संक्रमण शिबीरात दैनंदिन भाडे वसुलीकार पाठवावेत,आवश्यक कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र बैठकीचे आयोजन करावे, अपात्र असलेल्यांना गाळे देण्याबाबत कायद्यात आवश्यक दुरुस्ती अथवा प्रधानमंत्री आवास योजनेसारखी योजना आणावी, संक्रमण शिबीरात स्वच्छतेचे काम नियमित व सुरळीत होणे आवश्यक असल्याचे वायकर यांनी सांगितले.
- गिरगाव येथील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत, क्लस्टर झोन असल्यास प्राधान्याने बाजूच्या इमारतींसह रहिवाशांनी क्लस्टर बनवावेत व प्रस्ताव सादर करावा. सद्यस्थितीत4 इमारतींचे सर्व प्लॉट 4 हजार चौरस मीटरपेक्षा कमी आहेत. ज्याचे क्षेत्रफळ 4 हजार चौरस मीटरपेक्षा कमी आहे, त्यासाठी डी.सी.आर मध्ये आवश्यक तरतुदी कराव्यात,असेही त्यांनी सांगितले. transit camp issue