- महिला बचत गटांना फराळ विक्रीसाठी 1 रुपयात जागा देणार
मुंबई, 28 सप्टेंबर 2017/AV News Bureau:
दिवाळीच्या दिवसात फराळ विक्री करणाऱ्या महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी एसटी महामंडळ सरसावले आहे. आपल्या एसटी डेपोंमधील जागा नाममात्र 1 रुपये शुल्क आकारून महिला बचत गटांसाठी देणार आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात राज्याच्या विविध भागांत एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना एसटी डेपोतच घरगुती फराळाची चव चाखता येणार आहे. mahila bachat gat and diwali faraal
दिवाळीच्या काळात महिला बचत गटांनी तयार केलेल्या फराळाला मोठी मागणी असते. त्यामुळे अधिकाधिक ठिकाणी महिला बचत गटांच्या फराळाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक बसस्थानकावर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दिवाळी भाऊबीज भगिनी सन्मान योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. mahila bachat gat and diwali faraal
- या योजनेअंतर्गत प्रत्येक बसस्थानकावर जागेच्या उपलब्धतेनुसार 100 चौ. फुटाचे 1 दालन या प्रमाणे कमाल 5 दालने प्रत्येकी 1 रुपये शुल्क आकारून अर्जदार महिला बचत गटांना 8 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या काळात देण्यात येणार आहेत.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बचत गटांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विभागीय कार्यालयाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर करण्याची मुदत 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक महिला बचत गटांनी एसटीच्या स्थानिक विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा असे आहवान एसटी महामंडळाने केले आहे. mahila bachat gat and diwali faraal