मोरबेची जलवाहिनी फुटली, संध्याकाळी पाणी पुरवठा नाही

 

  • उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा होणार

नवी मुंबई, 23 सप्टेंबर 2017/AV News Bureau: no water supply today in navi mumbai

नवी मुंबई आणि परिसराला पाणीपुरवठा करणा-या मोरबे धरणाची जलवाहिनी आज सकाळी अकराच्या सुमारास फुटल्यामुळे एकच खळबळ उडाली. सायन-पनवेल महामार्गाजवळ कामोठे येथे जलवाहिनी फुटून तब्बल 30 फूट उंच पाण्याचे फवारे उडू लागले. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. दरम्यान जलवाहिनी फुटल्यामुळे आज संध्याकाळी बेलापूर ते ऐरोली आणि कामोठे परिसरात होणार पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आल्याची माहिती नवी मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. no water supply today in navi mumbai

  • मोरबे धरणातील पाण्यावर प्रक्रिया करणा-या भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रातून नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारी 2042 मि.मि. व्यासाची मुख्य जलवाहिनी आहे.  कामोठे येथील के.ई.एल.एज्युकेशन कॉलेजजवळ प्रेसिडन्सी हॉटेलसमोर सिडकोमार्फत अंतर्गत रस्त्याचे काम सुरू होते. हे काम करणाऱ्या मे. गिरीश एन्टरप्राईजेस प्रा.लि. या ठेकेदार कंपनीच्या पोकलेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह नादुरूस्त झाला. त्यामुळे जलवाहिनी फुटली आणि पाणी वाया गेले. याचा खर्च संबंधित ठेकेदार यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे. no water supply today in navi mumbai

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत तातडीने जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येऊन पूर्ण करण्यात आले आहे व दुरूस्ती काळात बंद करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याचे पंपींग 4 वाजल्यापासून सुरू करण्यात आले आहे. या तातडीने कराव्या लागणाऱ्या दुरूस्ती कामामुळे आज 23 सप्टेंबर रोजी संध्याकाळी बेलापूर ते ऐरोली तसेच कामोठे परिसरात पाणीपुरवठा होणार नाही तसेच उद्या 24 सप्टेंबर रोजी सकाळीही कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नोंद घेण्यात यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. no water supply today in navi mumbai