फिफा वर्ल्ड कपचा असा रंगणार ‘थरार’

  • नवी मुंबईतील 8 सामन्यांमध्ये 6 संघ एकमेकांशी भिडणार
  •  6 ते 25 ऑक्टोबर या काळात सामन्यांदरम्यान नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत होणार बदल

स्वप्ना हरळकर / अविरत वाटचाल न्यूज

  • 24 सप्टेंबर 2017,नवी मुंबई fifa world cup matches in navi mumbai

ऑक्टोबर महिन्यात होणा-्या U-17 फिफा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी नवी मुंबई देखील सज्ज झाली आहे. नेरुळच्या डी.वाय. पाटील स्टेडीयमवर या स्पर्धेतील आठ सामने होणार आहेत. या सामन्यांमध्ये अमेरिका, कोलंबिया सह अनेक देशांच्या खेळाडूंचा दर्जेदार खेळ पाहण्याची संधी महाराष्ट्रातील प्रेक्षकांना मिळणार आहे. हे सामने पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. ही बाब लक्षात घेवून शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नेरुळ परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. तसेच सुमारे 4 हजार 650 वाहनांच्या पार्किंगसाठी वाहतूक पोलिसांनी नियोजन केले आहे. सामन्यांच्यावेळी प्रेक्षकांच्या सोयीसाठी नवी मुंबई परिवहनच्यावतीने विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. fifa world cup matches in navi mumbai

नवी मुंबईत रंगणार 8 सामने fifa world cup matches in navi mumbai

 

4 हजार 650 वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था fifa world cup matches in navi mumbai

फिफा वर्ल्ड कपच्या नवी मुंबईतील सामन्यांना होणारी गर्दी लक्षात घेवून नवी मुंबई पोलिसांतर्फे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच नेरुळच्या डी.वाय. पाटील स्टेडीयममध्ये होणारे सामने पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पार्किंगची विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सामन्यांच्या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेवून त्याक्षणी  नियोजन व्यवस्थेत बदल करण्यात येतील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांनी ‘अविरत वाटचाल’ न्यूजशी बोलताना दिली.

  • फिफा वर्ल्ड कप सामन्यांदरम्यान करण्यात येणारी पार्किंग व्यवस्था 
  • पोडीयम पार्किंग (MIP) : 50 वाहने
  • उरण फाटा पार्किंग (VIP): 300 वाहने
  • उरण फाटा पार्किंग प्रेक्षकांसाठी : 300 वाहने
  • गणपत शेट तांडेल मैदान – 700 वाहने
  • सिवुड्स मॉल पार्किंग – 1000 मैदान
  • लिटील वर्ल्ड, खारघर पार्किंग – 300 वाहने
  • रहेजा पार्किंग – 2000 वाहने

वाहतुकीत करण्यात येणारे  बदल fifa world cup matches in navi mumbai

  • फुटबॉल सामन्यांना गर्दी होणार हे लक्षात घेवून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नेरुळ परिसरातील वाहतूक व्यवस्थेत काहीसा बदल करण्यात येणार आहे.
  • एलपी सर्कल बंद करणे
  • डॉ सर्व्हिस रोड नो पार्किंग झोन
  • एमआयडीसी सर्व्हिस रोड नो पार्किंग झोन
  • (भिमाशंकर कट उरण फाटा-एलपी जंक्शन
  • भिमाशंकर कट उरण फाटा-शिवाजी चौक-शनि गेट-शनि मंदीर-आर.आर.पाटील उद्यान- भिमाशंकर उद्यान हा मार्ग एक दिशा मार्ग ठेवण्यात येणार आहे.
  • नवी मुंबई महापालिकेतर्फे पुरविण्यात येणारी विशेष बस सेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळून इतर वाहनांना बंदी