ध्वनीप्रदूषण व अनधिकृत मंडपांच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

महापालिकेची तक्रार निवारण यंत्रणा

नवी मुंबई, 22 सप्टेंबर 2017/AV News Bureau:

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ध्वनीप्रदूषणासंबधी व अनधिकृत मंडपाबाबत तक्रारींकरीता महापालिकेने “तक्रार निवारण यंत्रणा” सुरू केली आहे. या यंत्रणेमध्ये सर्व विभाग कार्यालयांमध्ये तक्रार निवारण नोंदवही ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये नागरिक तक्रार दाखल करू शकतात.

विभागाचे नांव            सहा.आयुक्त तथा    विभाग अधिकारी यांचे नांव                टोल फी क्रमांक
नमुंमपा मुख्यालय दिवाकर समेळ 1800222309
बेलापूर प्रियंका काळसेकर 1800222312
नेरुळ चंद्रकांत तायडे 1800222313

 

वाशी महेंद्रसिंग ठोके 1800222315

 

तुर्भे अंगाई साळूंखे 1800222314

 

कोपरखैरणे अशोक मढवी 1800222316

 

घणसोली दत्तात्रय नागरे 1800222317 

 

ऐरोली संध्या अंबादे 1800222318

 

दिघा प्रकाश वाघमारे 1800222319  

 

 

महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नवरात्रौत्सव मंडळ / संस्था / व्यक्ती यांनी नवरात्रौत्सव शांततेत व सुव्यवस्थित रितीने पार पडण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेस संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.