अहमदाबाद, 17 सप्टेंबर 2017: sardar sarovar dam
गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथील सरदार सरोवर धरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशाला अर्पण करण्यात आले. या धरणामुळे अनेक राज्यांमधील सुमारे 4 कोटी लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सरदार सरोवर प्रकल्प हे जगातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. सर्वात मोठे धरण ग्रॅंड कुली अमेरित आहे. sardar sarovar dam
- सरदार सरोवर प्रकल्पाचा लाभ गुजरातसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांना होणार आहे. या धरणामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नच नाही तर कृषीक्षेत्रालाही त्याचा अधिक फायदा होणार आहे.
- या धरणातील पाणी कालव्याच्या माध्यमातून नऊ हजार गावांमध्ये पोहोचणार आहे. त्याचा फायदा सुमारे 4 कोटी नागरिकांना होईल शिवाय 18 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन सिंचनाखाली येणार आहे.
- सरदार सरोवर प्रकल्पाची मूळ उंची 121.92 मीटर होती. त्यामध्ये वाढ करण्यात आली असून आता धरणाची उंची 138 मीटर इतकी आहे. उंची वाढविल्यामुळे धरणातील पाण्याची साठवण क्षमता 4.73 दशलक्ष इतकी झाली आहे.
- या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या वीजेपैकी सुमारे 56 टक्के वीज महाराष्ट्राला मिळणार आहे. तर उर्वरित वीज गुजरात,मध्यप्रदेश आदी राज्यांना मिळणार आहे.
सरदार सरोवर प्रकल्प सुरुवातीपासूनच वादात सापडला. न्यायालयीन खटले आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून सरदार सरोवर धरणाचा मुद्द पेटत राहीला. नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांनी या प्रकल्पाविरोधात मोठे आंदोलन केले. या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घण्यात आली होती.