समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांची चिंता
मुंबई, 13 डिसेंबर 2016/AV News Bureau:
येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी करून दाखवू. मात्र ओबीसी आरक्षणामुळे अनेक ठिकाणी उमेदवार मिळणे कठीण होत आहे अशी चिंता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई महापालिकेत आम्ही ११२ ठिकाणी निवडणुक लढण्याची तयारी केली आहे.मात्र ओबीसी आरक्षणामुळे अनेक ठिकाणी उमेदवार मिळणे कठीण होत आहे. मात्र या सर्व अडचणींवर मात करण्यास आम्ही यशस्वी होवू आणि येत्या महापालिका निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
एमआयएमचा कॉंग्रेसला फटका बसेल
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत एमआयएमचा फटका समाजवादी पार्टीपेक्षा काँग्रेसला सर्वाधिक बसेल, असा आमचा अंदाज आहे. तर भाजप आणि एमआयएम परस्पर विरोधी विधाने करून प्रचार आपल्याभोवतीच केंद्रीत करत असल्याचे सांगत दोन्ही पक्षांची छुपी युती असू शकते. तसेच एमआयएमकडे इतका पैसा आला कुठून याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आझमी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.