अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना 280 कोटींचे वाटप

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 17 सप्टेंबर 2017/AV News Bureau:

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना सहाशे पेक्षा जास्त अभ्यासक्रमात 50 टक्के फी माफीची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांना 280 कोटी रुपयाचे वाटप केले असून गेल्या 9 वर्षात या योजनेत सर्वात जास्त निधी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूर येथे सांगितले.

  • मेहमुदा शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित कमवा आणि शिका कार्यक्रमाअंतर्गत धनादेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अल्पसंख्यांक मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत अंजूमन महाविद्यालयातील 700 विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी 31 लाख 50 हजार रुपये शिष्यवृत्ती धनादेश वितरण करण्यात आले.

 

  • सबका साथ सबका विकास या धोरणानुसार राज्य शासनाने अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी अनेक योजना आखल्या आहेत. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांची 600 पेक्षा जास्त अभ्यासक्रमात 50 टक्के फी शासन भरते. या योजनेचा 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांना लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेचा गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचेही ते म्हणाले.