- राज्यातील धरणांमध्ये 67 टक्के साठा
- आजअखेर 787 मि.मी. पावसाची नोंद
मुंबई, 12सप्टेंबर 2017/AV News Bureau:
राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील 312 गावे आणि तब्बल 1 हजार 504 वाड्यांना ऐन पावसाळ्यात 302 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ शासनावर आली आहे.दरम्यान राज्याच्या बहुसंख्य भागात चांगला पाऊस पडल्याने धरणांमधील पाण्याचा साठा 67 टक्के इतका झाला आहे.
राज्यातील पर्जन्यमान
- राज्यात 1 जून ते 11 सप्टेंबर या काळात 1 मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली. हा पाऊस सरासरीच्या 77.9 टक्के एवढा असून गेल्या वर्षी याच सुमारास तो सरासरीच्या 85.4 टक्के एवढा झाला होता.
जिल्हानिहाय पावसाची टक्केवारी
- ठाणे, रायगड, पालघर, अहमदनगर, पुणे, बीड, उस्मानाबाद या सात जिल्ह्यांत 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस
- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सातारा, सांगली, जालना, लातूर, बुलढाणा, नागपूर या बारा जिल्ह्यांत 76 ते 100 टक्के पाऊस
- जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चौदा जिल्ह्यांत 51 ते 75 टक्के पाऊस
- यवतमाळ या एका जिल्ह्यात 26 ते 50 टक्के पावसाची नोंद झाली.
धरणात 67 टक्के पाणी साठा
राज्याच्या जलाशयातील सर्व प्रकल्पांतील पाणीसाठ्यात 66.88 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच सुमारास 68.23 टक्के पाणी साठा होता.
जलाशयातील विभागनिहाय सध्याचा आणि कंसात गतवर्षीचा साठा पुढीलप्रमाणे
- मराठवाडा-05 टक्के (35.57)
- कोकण-32 टक्के (92.12)
- नागपूर-15 टक्के (58.44)
- अमरावती-77 टक्के (65.82)
- नाशिक-98 टक्के (71.58)
- पुणे-10 टक्के (80.65)
राज्यात 302 टँकर्स सुरू
- राज्यातील 312 गावे आणि 1504 वाड्यांना आजअखेर 302 टँकर्समार्फत पाणी पुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी याच दिवसांत 144 गावे आणि 680 वाड्यांसाठी 204 टँकर्स सुरू होते. प्रामुख्याने औरंगाबाद, बुलढाणा, अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील टंचाईग्रस्त गावांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.