मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांचा इशारा
मुंबई, 8 सप्टेंबर 2017/AV News Bureau: aarey metro car shed issue
मुंबईतील एकमेव ग्रीन झोन असलेला आरे विभाग मी एक मुंबईकर म्हणून त्याला वाचवणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आरेमध्ये मेट्रो कार शेड होऊ देणार नाही. मी मुंबईकरांना आवाहन करतो की सगळ्यांनी आरे बचाव चळवळीमध्ये सहभागी व्हावे. आरेमध्ये मेट्रो कार शेड हा मुख्यमंत्र्यांचा खूप मोठा घोटाळा आहे. आम्ही मागील पत्रकार परिषदेत आरेतील जागा ही वनजमीन असल्याचे सर्व पुरावे सादर केले. त्यावर मुख्यमंत्र्यानी चलाखी करून ही जागा “नो डेव्हलेप्मेंट झोन” म्हणून घोषित केली, म्हणजे तिथे ते भविष्यात व्यावसायिक बांधकाम करू शकतात. ही जागा बिल्डरांना व्यावसायिक बांधकामासाठी देण्याचा एक मोठा घोटाळा आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केला. aarey metro car shed issue
या पत्रकार परिषदेला आरे बचाव चळवळीचे अम्रिता भट्टाचार्य, स्टालिन, झोलू सहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री कार्यालयातून किंवा मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशनकडून कोणतेही ठोस उत्तर देत नाहीत. कोणतेही कागदपत्रे दाखवत नाहीत. भविष्यात गरज पडली तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू. मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशनला घेराव घालू. तरी हि मेट्रो यार्डचे काम सुरु झाले तर गांधीवादी पद्धतीने आंदोलन करू. जनतेची मोठी चळवळ उभी करू, पण मेट्रो यार्ड होऊ देणार नाही, असे निरुपम यांनी सांगितले.aarey metro car shed issue
आरे बचाव चळवळीचे स्टालिन म्हणाले की, आम्ही गेली अनेक वर्षे मुख्यमंत्री कार्यालय व मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशनच्या कार्यालयाचा पाठपुरावा करत आहोत. परंतु काहीच ठोस उत्तर किंवा कागदपत्रे आम्हाला देत नाहीत. फक्त माहितीच्या अधिकारातून आम्हाला सर्व कागदपत्रे मिळत आहेत. हे सरकार कधी सांगतात २५४ झाडे कापणार, कोर्टात सांगतात २२९८ झाडे कापणार प्रत्यक्षात मात्र ३८५१ झाडे कापायचे टेंडर काढतात. हे सरकार सामान्य जनतेशी, आमच्याशी व कोर्टाशीही खोटे बोलत आहे. प्रत्येक वेळी कोर्टात वेगवेगळे खुलासा देतात. वर्तमानपत्रातील जाहिरातीत वेगळे लिहितात. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो तेव्हा आम्हाला आश्वासन दिले की मी सर्व नियमानुसार करीन आणि त्याची कागदपत्रे तुम्हाला देऊ. परंतु त्यांनी अजून असे काहीच केलेले नाही,असा आरोपही स्टॅलिन यांनी केला.aarey metro car shed issue