मुंबई, 7 सप्टेंबर 2017/AV News Bureau:
कल्याण-लोणावळा भागातील मंकी हिल आणि खंडाळादरम्यान मालगाडीचे दोन डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वेची लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुपारी 3.55 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे मुंबई-पुणे तसेच कोल्हापूर दरम्यानच्या आणि या मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द, वळविण्यात तसेच वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
रद्द केलेल्या वा निर्धारित स्थानकाआधी थांबवलेल्या गाड्या
- 11009 सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्सप्रेस (7 सप्टेंबर रोजीची)गाडी कर्जतपर्यंत.
- 12125 सीएसएमटी-पुणे प्रगती एक्सप्रेस (7 सप्टेंबर रोजीची)गाडी रद्द
- 12123 सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन (7 सप्टेंबर रोजीची)गाडी रद्द
- 11023 सीएसएमटी-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस (7 सप्टेंबर रोजीची)गाडी रद्द
- 17411 सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस (7 सप्टेंबर रोजीची)गाडी रद्द
- 17412 कोल्हापूर- सीएसएमटी महालक्ष्मी एक्सप्रेस (7 सप्टेंबर रोजीची) रद्द
- 22107 सीएसएमटी-लातुर एक्सप्रेस (7 सप्टेंबर रोजीची) रद्द
- 12115 सीएसएमटी महालक्ष्मी एक्सप्रेस (7 सप्टेंबर रोजीची) रद्द
- गाडी क्रमांक 51029/51033 सीएसएमटी-बीजापुर/साइनगर शिर्डी फास्ट पॅसेंजर (7 सप्टेंबर रोजीची ) रद्द
- 11024 कोल्हापूर-सीएसएमटी सह्याद्री एक्सप्रेस (7 सप्टेंबर रोजीची) रद्द
- 17318 एलटीटी-हुबळी एक्सप्रेस (7 सप्टेंबर रोजीची) पनवेल-मडगाव-वास्को-हुबळीमार्गे वळविण्यात आली आहे.
याशिवाय इतरही अनेक गाड्या रद्द वा इतर मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.