मुंबई,22 ऑगस्ट 2017/AV News Bureau:
प्रायोगिक नाटकांसाठी पु. ल. देशपांडे कला अकादमीतील मिनी थिएटर आता सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. प्रत्येक महिन्यातील दोन सत्रे (सत्रे उपलब्धतेनुसार) प्रायोगिक नाटकांसाठी 50 टक्के सवलतीच्या दराने देण्यात येणार आहे.
नोंदणीकृत असलेल्या प्रायोगिक नाटय संस्थांना योग्य ते प्रमाणपत्र सादर केल्यानंतर ही सवलत मिळणार आहे. राज्य शासनाच्या अथवा राज्य स्तरावरील नाटय स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या प्रायोगिक नाटकांना ही सवलत मिळेल. ही सवलत त्या सत्राला असणाऱ्या दराच्या 50 टक्के असेल. मात्र अन्य कर स्वतंत्रपणे आकारण्यात येतील. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर ही सवलतीची सत्रे देण्यात येतील, असे शासनाने कळविले आहे.