कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी विशेष सोय
मुंबई, 17 ऑगस्ट 2017/AV News Bureau:
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 01113/01114 दादर- सावंतवाडी-दादर एक्सप्रेस या विशेष गाडीला गणपतीच्या काळात दिवा स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे दिवा रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या चाकरमान्यांना गाडी पकडणे सोयीचे जाणार आहे.
ही सोय 18 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या काळात दर रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- 01113 ही विशेष गाडी 18 ऑगस्ट के 8 सप्टेंबर या काळात सकाळी 7.50 ला दादर स्थानकातून सुटेल आणि सकाळी 8.33 ला दिवा रेल्वे स्थानकात पोहोचेल. दिवा रेल्वे स्थानकातून ही गाडी सकाळी 8.35 वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी 7.50 ला सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात पोहोचेल.
- 01114 ही विशेष गाडी 19 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या काळात दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी पहाटे 4.50 ला सावंतवाडी रेल्वे स्थानकातून सुटेल आणि दिवा स्थानकात दुपारी 3 वाजता पोहोचून दुपारी 3.2 मिनिटांनी सुटेल. ही गाडी सायंकाळी 4 वाजता दादर स्थानकात पोहोचेले.
- गाडीचे थांबे
01113/01114 दादर- सावंतवाडी-दादर एक्सप्रेसला ठाणे, दिवा, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
- डब्यांची रचना
01113/01114 दादर- सावंतवाडी-दादर एक्सप्रेसला 1 एसी चेअर कार, 8 सेकंड सीटींग क्लास, 4 जनरल डबे जोडण्यात येणार आहेत.