मुंबई, 9 ऑगस्ट 2017/AV News Bureau:
मुंबईमध्ये आज होणाऱ्या मराठा आरक्षणासंदर्भातील मोर्चाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई शहरातील शाळांना आज एक दिवसाची सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले.
आज होणाऱ्या मोर्चासाठी मोठ्या संख्येने नागरिक येण्याची शक्यता असल्याने गर्दी होऊन वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था विचारात घेता तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या- येण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेता मुंबई शहरातील शाळा एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे तावडे यांनी सांगितले.