25 हजार वीज ग्राहकांना फटका
नवी मुंबई, 21 जुलै 2017/AV News Bureau:
उलवे नोडला वीजपुरवठा करणारी महावितरणची केबल तुटल्यामुळे उलवे नोडमध्ये तब्बल १५ तासांपासून वीजपुरवठा बंद आहे. जवळपास २५ हजार वीज ग्राहकांना याचा फटका बसला आहे. आज संध्याकाळी साडेपर्यंत हा वीजपुरवठा सुरळित होण्याची शक्यता असल्याची माहिती महावितरणच्या अधिका-यांनी दिली.
सीबीडी येथील महापालिका मुख्यालयाजवळ असणा-या उड्डाणपूलाखाली पावासामुळे पाणी साचले आहे. याठिकाणी मोठा खड्डा तयार झाला आहे. शुक्रवारी पहाटे अज्ञात इसमांनी या खड्यातले पाणी जाण्यासाठी जेसीबीने मार्ग काढण्याच्या प्रयत्न केला. या प्रयत्नातच या ठिकाणी असणारी महावितरणची केबल तोडली गेली. यामुळे शुक्रवारी पहाटे २.३० पासून उलवे परिसरातील वीजपुरवठा बंद असल्याची माहिती महावितरणचे अधिकारी मुरकुटे यांनी दिली. तुटलेली ही केबल पुन्हा जोडण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून संध्याकाळी ६.३० पर्यंत विद्युत पुरवठा पूर्वरत होईल अशी माहिती त्यांनी दिली.