जम्मू काश्मीर, 17 जुलै 2017:
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आज पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने गोळीबार केला जात आहे. आज सकाळी पाकच्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे. मुद्दसर अहमद असे शहीद झालेल्या भारतीय जवानाचे नाव आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात एका मुलीचाही मृत्यू झाला आहे. पूंछ जिल्ह्यातील भिंबर गली सेक्टरमधील बालाकोट भागात पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार केला जात असून भारतीय सुरक्षा दलही जोरदार प्रतिकार करीत असल्याचे वृत्त आहे.
आज सकाळपासूनच पाकिस्तानी सैन्याकडून अंदाधुंद गोळीबार सुरू आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या चौक्या आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य करून पाकिस्तानी सैन्य विनाकारण गोळीबार करीत आहे. त्यावर भारतीय सैन्यही पाकिस्तानच्या गोळीबाराचे जशास तसे प्रत्युत्तर दिले जात असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.