नवी दिल्ली, 15 जुलै 2017/AV News Bureau:
भारतीय रेल्वेत एक नवा अध्याय सुरू झाला आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या पहिल्या रेल्वेगाडीचे शुक्रवारी लोकर्पण करण्यात आले.
ही ट्रेन दिल्लीच्या सराई रोहिल्ला ते हरयाणामधील फरूख नगर या मार्गावर धावणार आहे. सौर ऊर्जेचा वापर रेल्वेसेवांमध्ये होणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होणार आहे.
भारतीय रेल्वेगाड्या हरीत आणि पर्यावरण सुसंगत करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल. भविष्यात अशा प्रकारच्या आणखी रेल्वेगाड्या तयार केल्या जातील असे आहे असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. येत्या पाच वर्षात 1,000 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्याचे भारतीय रेल्वेचे उद्दिष्ट असल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी दिली.
ट्रेनची वैशिष्टे
- या ट्रेनच्या डब्यांच्या छतांवर बसविलेल्या 16 सोलार पॅनलच्या माध्यमातून त्या डब्यांमधील पंखे, दिवे आणि माहिती यंत्रणेसाठी लागणारी सौर ऊर्जा निर्माण होते. बॅटरी बँकेची सुविधा हे या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या रेल्वेगाडीचे वैशिष्ट्य आहे. 72 तासापर्यंत ही बॅटरी काम करू शकणार आहे.
- या 16 सोलार पॅनलमधून प्रत्येकी 300 डब्लू.पी.
- मेक इन इंडिया च्या प्रकल्पातून ह सौर पॅनल तयार करण्यात आले आहेत. या सौर पॅनलची किंमत 45 लाख रूपये आहे.
- या गाडीचे डब्बे चेन्नई येथील कारखान्यात तयार करण्यात आले असून सौर पॅनल आणि सौर यंत्रणा दिल्लीमध्ये विकसित करण्यात आली आहे.