नवी मुंबई, 13 जुलै 2017/AV News Bureau:
नवी मुंबई मनपा आयुक्त एन रामास्वामी यांनी ऐरोली प्रभाग समितीचे अध्यक्ष तथा प्रभाग क्रं 12 चे शिवसेना नगरसेवक संजू वाडे यांच्या प्रभागातील बहुउद्देशीय इमारतीच्या कामाची पाहणी केली.
ऐरोली सेक्टर 2 मध्ये साकारण्यात येणार्या बहुउद्देशीय इमारतीमधील तिन्ही मजले स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास क्रमासाठी देण्यात यावे अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. सेक्टर 2 मधील बंद अवस्थेत असलेल्या समाजमंदीराच्या जागी महिला व पुरुषांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा बांधण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर झालेला होता. त्यानुसार आजच्या पाहणी दौऱ्यात व्यायामशाळेला आयुक्तांनी मंजूरी दिल्याचे वाडे यांनी सांगितले.
सेक्टर 2 मधील हायटेन्शन वायरचा नागरिकांना त्रास होवू नये यासाठी उपाययोजना करण्याबाबत हालचाली सुरू असल्याचेही वाडे यांनी सांगितले.