समाजवादी पार्टीचे नगरसेवक रईस शेख यांची मागणी
मुंबई, 9डिसेंबर 2016 /AV News Bureau:
दक्षिण मुंबईतील जुन्या शहरी आराखड्यामुळे रुंदीकरण न झालेल्या रस्त्यांवर बेस्ट परिवहन सेवेच्या मिनी बसेस सुरू करा, असा मागणी समाजवादी पार्टीचे मुंबई महापालिकेतील नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य रईस शेख यांनी महापौरांकडे एका अर्जाद्वारे केली आहे. या प्रस्तावावर गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊन हा प्रस्ताव सध्या महापालिका अयुक्तांच्या अभिप्रायार्थ पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास या परिसरातील महिला, वृद्ध व्यक्ती आणि शालेय विद्यार्थ्यांना चांगलाच लाभ होणार आहे.
दक्षिण मुंबईतील जुन्या शहरी आराखड्यामुळे या परिसरात अनेक ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. अनेक भागांमध्ये बेस्टची सेवा देणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. नागरिकांच्या सोयीसाठी नगरसेवक रईस शेख यांनी अशा भागांत बेस्टची मिनीबस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव महापौरांकडे दाखल केला होता. त्यावर गटनेत्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान या प्रस्तावाचे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी स्वागत केले.