मुंबई,8 जुलै 2017/AV News Bureau:
राज्य परिवहन महामंडळाच्या सहाय्यक (मेकॅनिकल) पदासाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा उद्या रविवारी, 9 जुलै रोजी महाराष्ट्रातील व ३१ जिल्ह्यांतील ८१ केंद्रांवर होणार आहे.
- सहायक (मेकॅनिकल) पदाच्या ३२९३ जागांसाठी ६१००८ प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत.
- सर्व उमेदवारांना, त्यांनी प्रवेश अर्जात नमूद केलेल्या ई-मेल पत्यावर त्यांचे परीक्षा प्रवेश पत्र ( हॉल तिकीट ) पाठविण्यात आले आहे.
- ज्या उमेदवारांना प्रवेश पत्र मिळालेले नाही त्यांनी १८००१२१८४१४ या नि:शुल्क दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
- परीक्षा १०० गुणांची (५०प्रश्न) असून सर्व केंद्रांवर एकाच वेळी म्हणजे सकाळी ११.३० ते १. ०० या कालावधीत घेण्यात येईल , याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.