नवी मुंबई,9 डिसेंबर 2016 / AV News Bureau:
केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विकसित केलेले Swachhata-MoUD हे अधिकृत App सर्वांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आपले लोकेशन निवडून डाऊनलोड करून घ्यावे व त्यावर दैनंदिन स्वच्छता विषयक तक्रारी नोंदवाव्यात आणि कार्यवाही नंतर फिडबॅक द्यावा असे आवाहन नवी मुंबई महापालिकाआयुक्त तुकाराम मुंडे यांनी केले. स्वच्छ सर्व्हेक्षण 2017 अंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांनी हे मोबाईल ॲप डाऊनलोड करून व त्यावर प्रतिसाद देऊन आपल्या नवी मुंबई शहराचे मानांकन उंचावण्यासाठी संपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.