नवी दिल्ली, ६ जुलै 2017/AV News Bureau:
शिक्षणासाठी तसेच नोकरी मिळवताना बोगस जात प्रमाणपत्राचा वापर केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तिला नोकरी आणि पदवी दोन्ही गमवावी लागेल असा महत्वापूर्ण निकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला. अशा व्यक्तिला शिक्षादेखील सुनावली जाऊ शकते असंही कोर्टाने स्पष्ट केलं.
बोगस जात प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवणारा व्यक्ती कधीपासून नोकरीवर आहे हे महत्वाचे ठरणार नाही. एखादी व्यक्ती २० वर्षापासून अधिक काळ नोकरीवर असला तरी बोगस जात प्रमाणपत्र आढळल्यास त्याची नोकरी जाईल तसंच त्याला शिक्षाही होऊ शकते असही कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या अपील याचिकेवर सुप्रीम कोर्टाने याबाबतचा महत्वपूर्ण निकाल देत उच्च न्यायालयाचा आदेश रद्द ठरवला आहे.
गेल्या महिन्यात केंद्र सरकारनं बोगस जात प्रमाणपत्रांचा वापर करून नोकरी मिळविणा-या कर्मचा-यांना सेवेतून काढून टाकले जाईल अशी घोषणा केली होती,