मुंबई, 4 जुलै 2017/AV News Bureau:
राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यातील नेमक्या किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळाला, याची चर्चा सध्या सुरू आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळाला,याची माहिती जाहीर केली आहे.
राज्य सरकारच्या धोरणानुसार दीड लाखापर्यंतचे कर्ज असलेले आणि सात बारा पूर्ण कोरा होणाऱ्या राज्यातील एकूण 36 लाख 10 हजार 216 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. राज्यातील जिल्हानिहाय किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार याची आकडेवारीच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि देशातील आघाडीचे शहर असणाऱ्या मुंबई शहरातील कर्जबाजारी शेतकरी असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील सुमारे 694 शेतऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार असल्याचेही या यादीतून पुढे आले आहे. दरम्यान,मुंबईत शेतकरी आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत सांगितले की, कर्जमाफी योजनेच्या लाभार्थ्यांची जी यादी आम्ही जाहीर केली आहे, ते प्रस्तावित लाभार्थी आहेत. त्यामुळे सगळेच शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत का, याची चौकशी करूनच निर्णय घेतला जाईल, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
जिल्हानिहाय कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांचा तपशील पुढीलप्रमाणे