नवी मुंबई, 26 जून 2017/AV News Bureau:
एपीएमसीचे ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र शेळके यांची अभ्युदय बॅंकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बॅंकेंचे अध्यक्ष सिताराम घनदाट यांनी शेळके यांचे संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले.
राजेंद्र शेळके हे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. अनेक सामाजिक कार्यात ते सहभाग घेतात. सामाजिक विकास मंचाच्या माध्यमातून ते सामाजिक प्रश्नांवर काम करीत असतात.
अभ्युदय बॅंकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी नेहमीच सक्रीय असणाऱ्या या बॅंकेच्या संचालकपदी निवड झाल्यामुळे आपली जबाबदारी वाढल्याचे राजेंद्र शेळके यांनी सांगितले.