स्मार्टसिटीसाठी आणखी 30 शहरांची निवड

 

महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड 18 व्या क्रमांकावर

नवी दिल्ली, 23जून 2017:

केंद्र सरकारने स्मार्ट सिटी विकसित करण्यासाठी आज आणखी 30 नवीन शहरांची यादी  जाहीर केली आहे. 25 जून 2015 रोजी स्मार्ट शहर अभियान सुरू झाल्यानंतर आतापर्यंत एकूण 90 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. स्मार्ट शहरांसाठी महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड  या एकाच शहराची निवड झाली असून हे शहर 18 व्या क्रमांकावर आहे.

नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत केंद्रीय शहर विकास , गृह आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्री  एम. व्यंकय्या नायडू यांनी स्मार्ट शहरांची नवीन यादी जाहीर केली.

केंद्र सरकारने नव्याने 40 शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या  स्मार्ट शहरांच्या स्लॉटसाठी एकूण 45 अर्ज आले होते. परंतु नागरिकांच्या आकांक्षा पूर्तीसाठी व्यवहार्य तसेच कार्यरत योजनांच्या सुनिश्चिततेसाठी केवळ 30 शहरांचीच निवड करण्यात आली आहे.

30 शहरांच्या या यादीत केरळमधील त्रिवेंद्रम प्रथम क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड 18 व्या क्रमांकावर आहे.

स्मार्ट शहर अभियानाअंतर्गत उर्वरित 10 स्मार्ट शहरांच्या स्लॉटसाठी 20 शहरे शर्यतीत आहेत, असंही नायडू यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारने जाहीर केलेली यादी

SMART CITY LIST