रेल्वे स्थानकांवर 1 रुपयात पिण्याचे शुद्ध पाणी

मुंबई, 20 जून 2017/AV News Bureau:

रेल्वे प्रवाशांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी अल्पदरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या 20 स्थानकांवर 37 वॉटर वेंडिंग मशिन लावण्यात आली आहे. आरओ तंत्रज्ञानाचा वापर करून शुद्ध केलेले पाणी प्रवाशांना 1 रुपयात 300 मिलि पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर 76  वॉटर वेंडिंग मशिन लावण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी 37 मशीन्स लावण्यात आल्या आहेत. यामध्ये सीएसटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांवर  4 मशीन्स लावण्यात आल्या आहेत. तर पनवेलमध्ये 3 आणि इगतपुरी स्थानकात 2 मशीन्स लावण्यात आल्या आहेत.

याशिवाय भायखळा, परळ, कुर्ला, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी, मुलूंड, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, मानखुर्द, किंग सर्कल, रे रोड स्थानकांवर प्रत्येकी 1 वॉटर वेंडिंग मशिन लावण्यात आली आहे.

स्वतःची  पाण्याची बाटली वा  कंटनेर असणाऱ्या प्रवाशांना दर

  • 300 मिलि पाणी -1 रुपया
  • 500 मिलि पाणी – 3 रुपये
  • 1 लिटर पाणी -5 रुपये
  • 2 लिटर पाणी – 8 रुपये
  • 5 लिटर पाणी- 20 रुपये

पाण्याची बाटली वा कंटनेर नसणाऱ्या प्रवाशांना दर

  • 300 मिलि पाणी -2 रुपये
  • 500 मिलि पाणी – 5 रुपये
  • 1 लिटर पाणी -8 रुपये
  • 2 लिटर पाणी – 12 रुपये
  • 5 लिटर पाणी- 25 रुपये